सांगली (शालेय वृतसेवा ) :
कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज, पेठ येथे शाळेच्या दर्शनी फळ्यावर कलाशिक्षक अरविंद कोळी यांच्या फलकरेखाटनाची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेतली दखल.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी .. छत्रपती ताराराणी या नवीन चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसारित झाले. यातील छत्रपती ताराराणी (सोनाली कुलकर्णी) या घोड्यावर स्वार झालेल्या, हातात तलवार घेतलेली, डोळ्यातील करारीपणा व विजांच्या कडकडाटासह पाऊस या प्रसंगाचे रेखाटन कासेगांव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज, पेठ येथे शाळेच्या दर्शनी फळ्यावर कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूंच्या सहाय्याने जागतिक महिला दिनानिमित्त केले होते.
या फलकरेखाटनाची दखल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी घेत अरविंद कोळी यांना "अप्रतिम सर" म्हणत आपल्या फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर शाळेच्या नावासहित शेअर केला आहे.


आदरणीय मुनेश्वर सर... आपले मनापासून आभार.. आपल्या लोकप्रिय मराठील पहिल्या वेब पोर्टलवर फलकरेखाटनाच्या बातमीस प्रसिद्धी दिली त्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा