नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षण विभाग जि प नांदेड व नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कब-बुलबुल, स्काऊट-गाईड नोंदणी व उजळणी वर्ग जि.प.हायस्कुल,अर्धापुर येथे दिनांक ०३/०८/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली होता. या नोंदणी व उजळणी वर्गास अध्यक्ष म्हणून जि.प.हायस्कूल अर्धापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख यांची उपस्थिती लाभली तर उद्घाटक म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर गुट्टे यांचे मार्गदर्शन लाभले गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती,अर्धापुर यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील *प्राथमिक व माध्यमिक शाळेतील एकुण 65 शिक्षक/ शिक्षिका सहभागी झाले होते.
या उजळणी वर्गाच्या सुरुवातीस चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट गाईड प्रथेप्रमाणे प्रार्थनेने उजळणी वर्गाची सुरुवात झाली. मा.गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर गुट्टे यांनी मार्गदर्शनात शाळा तेथे कब बुलबुल स्काऊट गाईड पथक सुरू करण्याबाबत उपस्थितांना सूचित केले.या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री विकास चव्हाण यांनी स्काऊट गाईड ही चळवळ वर्तनात परिवर्तन घडवून आणणारी चळवळ आहे असे सांगितले.
याप्रसंगी स्काऊट गाईड ऑफलाईन व ऑनलाईन नोंदणी बाबत जिल्हा संघटक गाईड श्रीमती शिवकाशी तांडे यांनी मार्गदर्शन केले तर अभ्यासक्रमाच्या टप्प्यांबाबत श्री विनोद सोनटक्के व श्री सतीश वाकोडे यांनी माहिती दिली तसेच प्रशिक्षणाच्या टप्प्यांबाबत व विविध पुरस्कार याबाबत श्री रमेश फुलारी यांनी मार्गदर्शन केले तर स्काऊट गाईड चळवळीचे जीवनातील महत्त्व याबाबत जिल्हा संघटक स्काऊट श्री जनार्दन यांनी माहिती दिली तसेच कब बुलबुल अभ्यासक्रमाबाबत फ्लॉक लीडर श्रीमती उषा नळगिरे यांनी माहिती दिली.
याबैठकीस तालुक्यातील साधन व्यक्ती श्री केसराळीकर, श्री वारे, श्री रजाक यांनी उपस्थित राहून बैठकीचे नियोजन केले. तसेच उजळणी वर्गाचे सूत्रसंचालन स्काऊट मास्टर श्री विनोद सोनटक्के यांनी केले तर प्रास्ताविक श्री जनार्दन इरले यांनी केले.तर आभार सह शिक्षक श्री प्रभाकर वाडकर यांनी व्यक्त केले व राष्ट्रगीताने उजळणी वर्गाची सांगता झाली.
या नोंदणी वर्गास कार्यालयातील क.लिपिक श्रीमती अनुराधा कोटपेट यांनी उपस्थित राहून कार्य केले. तसेच या कार्यशाळेस जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. सौ सविता बिरगे मॅडम, जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (मा.) श्री प्रशांत दिग्रसकर सर यांनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .