जिल्हा परिषद भरती | zilla parishad bharti 2023 maharashtra

शालेयवृत्त सेवा
0

 जिल्हा परिषद भरती 2023 pdf

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या  हजारो रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. 

जिल्हा परिषद भरती 2023 महाराष्ट्र

सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.  तसेच, उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही,परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबविली जाईल.
पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण –महाराष्ट्रात
वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

Related keywords-


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)