मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना भत्ता थेट बँक खात्यात मिळणार . .

शालेयवृत्त सेवा
0



मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन भत्ता ट्रायल पेमेंटसाठी आज एक रुपया; खाते तपासणीनंतर मिळणार उर्वरित रक्कम


सोलापूर ( शालेय वृत्तसेवा ) :

मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वी मतदान संपताच रोख स्वरूपात भत्ता मिळत होता. या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी सोमवारी (ता. १८) ट्रायल पेमेंटसाठी एक रुपया पाठविण्यात येणार असून पूर्ण रकमेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता. मात्र, पारदर्शक, पण प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

यापत्रात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार निवडणूक

• पूर्वी मतदान संपताच रोखीने मिळणारा भत्ता यंदा ऑनलाइन मिळत असल्याने यामध्ये पारदर्शकता घेणार आहे. मात्र, बुधवारीच संबंधित बँका ही रक्कम जमा करणे कठीण आहे. मुळात या दिवशी बँकेला सुटी आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर आहेत. यामुळे भत्तावाटप बुधवारीच होईल असे सांगता येत नाही. यामुळे यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे. व आहार भत्ता हा ऑनलाइन स्वरूपात देण्यात यावा. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बैंक खात्याचा तपशील पीपीएमएस (पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टिम) या स्वॉप्टवेअरमध्ये भरण्यात आलेली आहे. पहिल्या व दुसन्या प्रशिक्षणानंतर ही माहिती जमा करण्यात आलेली आहे. सोमवारी (ता. १७) यातील तपासणी करिता प्रत्येकाच्या खात्यावर प्रयोगिक तत्त्वावर एक रुपया पाठविण्यात येणार आहे.


मतदान रवाना करताना ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यावर एक रुपये ट्रायल पेमेंट मिळालेले नाही. त्यांचे बँक खाते अद्ययावत करण्यात येणार आहे. बँक खाते असल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी (ता (ता. १९) दुपारी तीन वाजता संपूर्ण यादी बँकेत दिली जाणार आहे. ही रक्कम बँकेने बुधवारी एक वाजता अदा करण्याची सूचना देण्यात आली आहे.


■ आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेत भत्ता वाटप करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखावर असे मतदानाची वेळ संपल्यानंतर इव्हीएम मतमोजणी केंद्रापर्यंत पोचविण्याची जबाबदारी प्रमुखांसह सर्व कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, यातील काही कर्मचारी वेळेअभावी दुसन्यावर जबाबदारी सोपवून निघून जात. यासाठी भत्ता मिळण्याचा अडसर होता. आता हा भत्ता ऑनलाइन मिळणार असेल तर केंद्र प्रमुखाचे यावरील नियंत्रण सुटणार आहे.


▪️ निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना वेगळा दैनिक भत्ता आहे. या व्यतिरिक्त प्रतिदिन दोन वेळचा जेवण भत्ता १५० रुपयांप्रमाणे मिळतो. प्रशिक्षण काळात जेवणाची व्यवस्था केलेली असते. यामुळे याकाळातील भत्ता कपात केला जातो. मतदानाच्या दिवशी व आदल्या दिवशीच मात्र जेवणाचा भत्ता दिला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)