शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त उपक्रम !
यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी); क गट (इयत्ता अकरावी ते पदवी) अ, ब आणि क गटातील एकूण ४७ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
विजेत्यांमध्ये अ गटात सार्थक मकरंद चव्हाण, नवी मुंबई; वेदांत शितल राहुल दहिफळे, जालना; श्रेया संजय चौधरी, वर्धा; तन्वी प्रफुल सावरकर, वर्धा; वैभवी सचिन सावरकर, वर्धा; जय भारत गोरवे, सोलापूर; कौस्तुभ मोहन महाजन, जळगांव; अदिती दामोधर डाखोरे, सोलापूर; युवराज दामोधर डाखोरे, सोलापूर; मृण्मयी प्राजक्ता अभिजित जोगळेकर, पुणे; प्रचिती किरण गायकर, पालघर; ऋग्वेद विवेक घाडी, मुंबई; किंजल चेतन पाटील, नंदुरबार; हर्षद संतोष राठोड, धाराशीव; रोहित सुनील पवार, धाराशीव; निधी गायत्री किशोर धानोरकर, वर्धा; प्रांजल मनोज पाटील, नंदुरबार; प्रिन्स प्रफुल्ल पाटील, कोल्हापूर; तनुल रवि परमार, मुंबई; तितिक्षा रवि परमार, मुंबई; पार्थ प्रशांत हिवरकर, नागपूर; युवराज अंकुश मोरे, पुणे; समीक्षा सागर नाईक, पुणे; सोनाक्षी सागर नाईक, पुणे; शांभवी नितीनसिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगर; दक्ष संदिप किटे, वर्धा; प्रसाद प्रमोद ठोंबरे, मुंबई; वर्षा नानाभाऊ मेंगाळ, अहमदनगर तसेच ब गटात नंदिनी सिद्धेश्वर हिंगमिरे, सोलापूर; अर्बिया अमिरपाशा शेख, सोलापूर; हिमांशू गणेश सोनवणे, धुळे; मनाली दिवाकर मादेशी, गडचिरोली; कावेरी दीपक मदने, नाशिक; मंथन योगेश राऊत, मुंबई; गौरंगी तुकाराम चव्हाण, पुणे; खुशी नारायण रिंगे, मुंबई; प्रिया प्रदीप देसाई, सिंधुदुर्ग; प्रियल विलास जवळ, मुंबई; निर्वी बिरू मदने, मुंबई; तृप्ती दत्तात्रय मान्टे, बुलढाणा; ज्ञानेश्वरी सुनील पवार, धाराशीव; तेजस विजय पाटील, नंदुरबार; अंश अभिषेक शर्मा, जयपूर, राजस्थान; साहिल राजेंद्र कौटे, अहमदनगर; सचित भरत बुळे, अहमदनगर तसेच क गटात यश प्रताप मुंजाळ, यवतमाळ; समृद्धी श्रावण सोनवणे, नाशिक; समीक्षा मधुसूदन कानकाटे, यवतमाळ यांचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, 'शिक्षण मंडळ भगूर' संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा, आसबेवाडी (मारापूर), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी ता. दिंडोरी, जि. नाशिक तसेच शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, नाशिक; कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे वर्धा; वसुधा नाईक, पुणे; कविता चौधरी, कविता हिंगमिरे जळगांव; संगीता पवार, मुंबई; दिवाकर मादेशी, गडचिरोली; डी. जी. पाटील, नंदुरबार; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर तसेच संपूर्ण संपादक मंडळाने अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .