▪️ नवीन वर्षात बदली प्रक्रिया आदेशाची अंमलबजावणी होणार
▪️ जिल्हा परिषद शिक्षकांच्या चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकावर कारवाई
बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने आतापासूनच तयारी केली आहे. याबाबतचे वेळापत्रक तयार केले आहे. नवीन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन ३१ मेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर या याद्यांवर १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आक्षेप घेता येईल.
◾१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे यांची माहिती जिल्हा परिषद निश्चित करेल.
◾शिक्षकाने पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे, अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी राहणार आहे. त्यानंतर शिक्षकाच्या वैयक्तिक प्रोफाईल मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
◾१ ते २० एप्रिल या कालावधीत बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा बदलीची प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीस उपलब्ध करून द्यायचा आहे. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत टप्पा क्रमांक १ नुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित केली जातील.
◾२८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत 3 शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील. त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देऊन बदलीची प्रक्रिया राबविली जाईल. ४ ते ९ मे दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग २ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित केल्या जातील व त्यांच्या बदल्या केल्या जातील.
◾१० ते १५ मे दरम्यान बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या होतील. १६ ते २१ मे दरम्यान बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होतील. २२ ते २७ मे दरम्यान विस्थापित शिक्षकांच्या बदल्या होतील. २८ ते ३१ मे दरम्यान अवघड क्षेत्रातील जागा भरल्या जाणार आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .