निकाल अपडेट – बारावी परिक्षेचा निकाल.. | Maharashtra State board of secondary and higher secondary results

शालेयवृत्त सेवा
0

 




5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहिर होणार. .


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती 


मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.



🌐 अधिकृत संकेतस्थळ


बारावीhttps://hscresult.mahahsscboard.in/




#SSC2025 #HSC2025 #निकाल2025 #दहावीनिकाल #बारावीनिकाल #MaharashtraBoard #ResultUpdate #EducationNews 

🔗 http://mahahsscboard.in

🔗 http://mahresult.nic.in

🔗 http://hscresult.mkcl.org

🔗 http://msbshse.co.in

🔗 http://mh-ssc.ac.in

🔗 http://sscboardpune.in

🔗 http://sscresult.mkcl.org

🔗 http://hsc.mahresults.org.in

━━━━━━━━━━━━━━━━━

शैक्षणिक Update जलद गतीने मिळवण्यासाठी आपले शालेयवृत्त मिडिया जॉईन करा.





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)